
उन्हाचे चटके आतापासूनच बसायला लागले आहेत. उन्हात जास्त वेळ राहिल्यास त्वचा काळी पडू शकते. त्यामुळे उन्हापासून त्वचा सुरक्षित ठेवायची असेल तर लांब बाह्यांचे शर्ट आणि पॅन्ट घाला, ज्यामुळे शक्य तितकी त्वचा झाकली जाईल. डोके, चेहरा आणि मान यांच्या संरक्षणासाठी रुंद कडा असलेली टोपी वापरा.
बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. उन्हात जास्त वेळ राहणे टाळा आणि सावलीचा आधार घ्या. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा. गॉगल वापरल्यास डोळे सुरक्षित राहू शकतात.




























































