
काही चटरफटर खाल्ल्यानंतर काही तासांनंतर पोटातून गुडगुड आवाज येतो. हा आवाज येणे म्हणजे पचन प्रक्रियेचा एक सामान्य भाग असू शकतो. परंतु तो येऊ नये याची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणेज दररोज जास्तीत जास्त पाणी प्या. जास्त पाणी पचन प्रक्रियेस मदत करते. त्यामुळे आवाज येत असेल तो कमी होतो. जेवणात सकस आहार घ्या.
तणावामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसातून एकदा योगा किंवा ध्यानधारणा करा. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करावा. पुरेसा आराम केल्यास गुडगुड आवाज कमी होण्यास मदत मिळते. जर पोटात जास्त गुडगुड आवाज येत असेल तर डॉक्टरांना दाखवा.