
रोजच्या जीवनशैलीत आपण सर्वात जास्त वेळ हा मोबाईल, टीव्ही , लॅपटॉप अशा स्क्रीनवरती घालवतो, त्यातील घातक किरणे आपल्या डोळ्यांना कमजोर बनवतात. त्यामुळे डोळ्यांचा नंबर वाढतो, अंधुक दिसायला लागते आणखीन बरेच डोळ्यांचे आजार होतात. यावर उपाय म्हणजे डोळ्यांचा नियमित व्यायाम, डोळ्यांची स्वच्छता, डोळ्यांची निगा यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहू शकते. बाजारात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या या आपल्या आहारात असायला हव्यात, यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी नेहमी चांगली राहते. हिरव्या पालेभाज्या जीवनसत्वाचा मोठा स्त्रोत आहेत. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आजच जेवणात करा.
दुसरा पदार्थ म्हणजे आवळा, आवळ्याचा रस रोज सकाळी घेतला तर कधीच चष्मा लागणार नाही, आवळ्याचे सेवन हे नेहमी करायलाच हवे. तसेच कच्चा आवळा, आवळ्याचे लोणचे अशा विविध प्रकारात तुम्ही आवळा खाऊ शकता. यातील गुणधर्म तुमच्या दृष्टीस कधीच निस्तेज बनवत नाहीत.
यानंतर घरातील इलायची, वेलदोडे, हे सुदधा आपल्या डोळ्यांसाठी भरपूर आवश्यक आहेत, वेलची आहारात असायला हवीच, वेलची तुम्ही तशीच खाऊ शकता किंवा त्याचे बडीशेप सोबत चूर्ण करून त्याचेही सेवन करू शकता. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
पुढचा पदार्थ आहे अक्रोड, कारण अक्रोड खायला बऱ्याच लोकांना आवडतात, त्यामुळे आपली बुद्धी तल्लख राहते, स्मरणशक्ती वाढते इतकेच नाही यातील जीवनसत्त्वे व फॅटी ऍसिड डोळ्यांना खूपच लाभदायी असतात. त्यामुळे अक्रोड खाणे सुरू करा.
यासारखाच आवडीचा पदार्थ म्हणजे बदाम, बोलताना अडखळत असाल तर बदाम खा, हुशार बनायचं असेल तर बदाम खा हे आपण ऐकतो पण डोळे चांगले ठेवायचे असतील तरी बदाम खात रहा. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते. डोळ्यांचा त्रास कमी होतो.
शेवटचा पदार्थ म्हणजे गाजर होय. गाजर , गाजराचा हलवा, ज्यूस सर्वच आपल्या सर्वांना आवडते. यामधून फक्त रोगप्रतिकारक शक्तीच मिळत नाही तर डोळ्यांना उपयुक्त सर्व घटक यातून मिळतात. म्हणून गाजराचे सेवन हे नेहमी करायलाच हवे. याव्यतिरिक्त शेवगा, शेवग्याची भाजी, शेंगा आपल्या आहारात ठेवल्यास डोळ्यांची समस्या नाहीशी होते. म्हणून आपल्या दृष्टीच्या , डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरील पदार्थ खायला सुरुवात करा.






























































