
सप्टेंबरपासून सण, उत्सवाला सुरुवात झाल्याने खरेदी-विक्रीत नवा रेकॉर्ड नोंदवला गेला. गणपती उत्सव ते नवरात्रोत्सवपर्यंत जोरदार खरेदी झाली असून यात अवघ्या सप्टेंबर 2025 मध्ये क्रेडिट कार्डवरून तब्बल 2.16 लाख कोटी रुपयांची खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के जास्त असून ऑगस्टच्या तुलनेत 13 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा आकडा 1.77 लाख कोटी रुपये होता. यादरम्यान ऑनलाइन शॉपिंगवर सर्वात जास्त खर्च करण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर 1.44 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला. सप्टेंबरमध्ये 11 लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यात आल्याने आता देशभरात एकूण कार्डांची संख्या 113.3 मिलियनपर्यंत पोहोचली आहे.
 
             
		



































 
     
    



















