
दिल्लीतील कर्तव्यपथावर आज प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day 2026) उत्साह पाहायला मिळाला. मात्र, या सोहळ्यातील आसनव्यवस्थेवरून आता राजकीय वादंग निर्माण झाले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हा प्रोटोकॉलचा भंग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ‘X’ वर पोस्ट करत सरकारवर कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले, ‘देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना अशा प्रकारची वागणूक देणे कोणत्याही सभ्यता, परंपरा किंवा प्रोटोकॉलमध्ये बसते का? हे केवळ न्यूनगंडाने ग्रासलेल्या सरकारची हतबलता दर्शवते’.
क्या देश के विपक्ष के नेता के साथ ऐसा व्यवहार किसी मर्यादा, परंपरा और प्रोटोकॉल के मापदंड पर खरा उतरता है ?
ये केवल हीन भावना से ग्रस्त सरकार की कुंठा दिखाता है ।
प्रजातंत्र में मतभेद रहेंगे मगर श्री @RahulGandhi के साथ किया जाने वाला ये व्यवहार अस्वीकार्य है। pic.twitter.com/b4mdU9BU7G
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 26, 2026
२०१४ च्या फोटोचा दाखला
काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी भाजपवर टीका करताना २०१४ मधील एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत लालकृष्ण अडवाणी पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. टागोर यांनी सवाल केला की, ‘२०१४ मध्ये अडवाणीजी कुठे बसले होते ते पहा. आताच हा प्रोटोकॉलचा गोंधळ का? मोदी आणि शाह यांना खर्गेजी आणि राहुलजींचा अपमान करायचा आहे का?’
महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये लालकृष्ण अडवाणी हे राज्यसभा किंवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते नव्हते, तरीही ते पहिल्या रांगेत होते. त्याच फोटोत दिसणारे अरुण जेटली त्यावेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते, तर सुषमा स्वराज लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
congress slams centre over rahul gandhi’s third row seat at republic day
congress leaders criticize bjp for seating rahul gandhi and mallikarjun kharge in the third row during republic day parade, alleging protocol violation.

























































