
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यात शिवसेनेला विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असताना आज रिपब्लिकन बहुजन सेनेनेदेखील जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांची भेट घेऊन पक्षाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही पाठिंबा देत असल्याचे घाटे यांनी सांगितले. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर आदी उपस्थित होते.































































