
ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास मदत करणाऱ्या कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेला दुकानदारांच्या री-केवायसीसाठी 15 सप्टेंबरची अंतिम मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. देशातील लाखो लहान-मोठ्या दुकानदारांचे आणि फेरीवाल्यांचे व्हेरिफिकेशन अद्याप पूर्ण झालेले नाही. आरबीआयने री-केवायसीची तारीख वाढवली नाही, तर लाखो दुकानदारांची ऑनलाईन पेमेंट प्रणाली बंद होऊ शकते.























































