नेवासा तालुक्यात कत्तलीसाठी आणलेल्या 12 गोवंशीय जनावरांची सुटका; 4 जणांना अटक

नेवासा तालुक्यातील चांदा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कत्तलीसाठी आणलेल्या 12 गोवंशीय जनावरांची सुटका करून 200 किलो गोवंशीय मांस असा एकुण 2,05,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चार जणांना अटक करण्यात आली आहे. जावेद इमाम शेख (45 वर्षे), मोहंमद कैफ शेख (22 वर्षे), सईद बाबु शेख ( 55 वर्षे), उजेर शकील शेख (30 वर्षे, सर्व रा. चांदा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार चांदा येथे जावेद शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे समजल्याने पोलिसांनी याठिकाणी कारवाई करीत चार जणांना अटक केली. तर मुजकीर जावेद शेख, आबु रशीद शेख (दोन्ही रा. चांदा) हे पळून गेले. यावेळी चाळीस हजार किमतीचे 200 किलो गोमांस, तसेच कत्तल करण्यासाठी आणलेले 12 गोवंशीय जनावरे, सत्तु, सुरे असा एकुण 2,05,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.