
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत येत्या १३ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षण सोडतीसंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. मागील चक्रकार पद्धतीच्या कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता पूर्णपणे नव्याने गट आणि गट यांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केली जाईल.
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढले जाईल, तर तालुका पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण हे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली काढले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याचे संकेत आहेत. राज्यातील ३२ आणि ३३६ पंचायत समित्यांच्या अनुक्रमे गट आणि ७३ गट, १४६ गण पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १३ पंचायत समित्यांचे एकूण १४६ गण आहेत. गेल्या निवडणुकीत ही संख्या अनुक्रमे ७५ आणि १५० होती. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३४ गावे पालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने गटांची संख्या दोनने तर, गणांची संख्या चारने कमी झाली आहे.
गणांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ८ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा समावेश आहे. गट-गणांच्या आरक्षणाची प्रारूप प्रसिद्धी १४ ऑक्टोबर रोजी केली जाईल. त्यावर सूचना हरकती घेऊन तीन नोव्हेंबरला अंतिम आरक्षित गट आणि गण जाहीर केले जाणार आहेत.
लोकसंख्येचा निकष लक्षात घेता जिल्हा परिषदेमधील पाच गट हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित होतील. शिरोली (आंबेगाव), बारव (जुन्नर), वाडा (खेड), डिंगोरे (जुन्नर) आणि टाकवे बुद्रुक (मावळ) हे गट आरक्षित होऊ शकतात. अनुसूचित जातीसाठी सात गट आरक्षित होतील. यामध्ये लासुर्णे आणि वालचंदनगर (इंदापूर), गुणवडी (बारामती), गोपाळवाडी (दौंड), नीरावाघच (बारामती), उरुळी कांचन व लोणी काळभोर (हवेली) हे गट लोकसंख्येमध्ये टक्केवारीनुसार सर्वाधिक आहेत.