महाराष्ट्रात पालिका निवडणुकीत रेवंत रेड्डी, कन्हैया कुमार करणार काँग्रेसचा प्रचार; स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनीतीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता  स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, नाना पटोले, खासदार इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमीन पटेल, डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, भाई जगताप, अनिस अहमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, आमदार साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुजफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

राहुल गांधी, प्रियांका गाधी  यांच्याबाबत उत्सुकता

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी प्रचारात उतरणार का? याची उत्सुकता काँग्रस कार्यकर्त्यांना आहे.