चालकाच्या ‘इयर फोन’ने केला घात, ठाण्यात धावत्या रिक्षातून तरुणीची उडी

2446
प्रातिनिधिक फोटो

कानात घातलेल्या ‘इयर फोन’मुळे प्रवासी मुलीचा आकाज न ऐकताच रिक्षा पळवणाऱ्या चालकाला घाबरून या मुलीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घोडबंदर रोडवर घडला. याप्रकरणी रिक्षाचालक कामरान खान (22) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून या घटनेत पीडित मुलगी जखमी झाली आहे.

घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरात पीडित तरुणी राहते. शाळा सुटल्यानंतर ती कासारवडवली येथून तिच्या मैत्रिणीसोबत रिक्षात बसली. रिक्षा भाईंदरपाडा येथे आली असता पीडित तरुणीच्या मैत्रिणीला रिक्षातून उतरायचे होते. त्यासाठी तिने रिक्षाचालक कामरान याला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र त्याने रिक्षा न थांबवता पुढे दामटकली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी मारली. यामध्ये तिच्या हाताला आणि चेहऱ्याला मार लागला आहे. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या