
रत्नागिरी शहरात काही दिवसापूर्वी रिक्षातून प्रवास करणाऱ्या युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाने जामिनावर सुटताच आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली.
अविनाश म्हात्रे हा रिक्षा चालक राहत असलेल्या साईदीप ग्रुह संकुल, शांतीनगर, नाचणे या इमारतीच्या टेरेस वर सदर रिक्षा चालकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. याची माहिती पोलिसाना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.
दोनच दिवसांपूर्वी या रिक्षा चालकाची जमिनावर मुक्तता झाली होती. रिक्षातून जाणाऱ्या युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी अविनाश म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली होती. सोशल मीडियावर आपल्या सोबत घडल्या प्रकाराची पोस्ट संबंधित युवतीने पोस्ट टाकल्यावर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.



























































