महायुतीत मंत्र्यांमध्ये जुंपली; सामाजिक न्याय विभागाची माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतली बैठक, शिरसाट यांनी व्यक्त केली नाराजी

महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून मतभेद निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागातील बैठकांवरून मंत्री संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात जुंपली आहे, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. या वृत्तानुसार, याबाबत संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठका घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय शिरसाट यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.

‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरी मिसाळ यांना यांना लिहिलेल्या पत्रात संजय शिरसाट म्हणाले आहेत की, “यापुढे सामाजिक न्याय विभागाच्या बैठका आपल्या (शिरसाट) अध्यक्षतेखालीच घ्याव्यात.” या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत कामकाजावरून मंत्र्यांमध्ये तणाव वाढल्याचे चित्र समोर आलं आहे.