
टीम इंडियाचा खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवार 8 जून रोजी संपन्न झाला.
लखनऊचे फाईव्ह स्टार हॉटेल ‘द सेंट्रम’मध्ये हा साखरपुडा पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या सारखपुड्याला अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली आणि दोघांना आशीर्वाद दिले.
साखरपुडा झाल्यावर आणि बोटामध्ये रिंग घातल्यानंतर खासदार प्रिया सरोज भावूक झाल्या आणि स्टेजवर असतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले.
रिंकू सिंह ‘क्लिन बोल्ड’, खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा pic.twitter.com/3MSYcKIfbP
— Saamana Online (@SaamanaOnline) June 8, 2025
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याला माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, डिंपल यादव, खासदार जया बच्चन, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह अनेक बडे राजकारणी उपस्थित होते.
साखरपुड्याआधी दोघांनी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील चौधरावली विचित्रा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
या सोहळ्यात दोघांनीही मॅचिंग वस्त्र परिधान केले होते. रिंकूने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, तर प्रियाने गुलाबी रंगाचा लहेंगा घातला होता.