
1 सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात फोन आहे. फोनमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. परंतु याचे काही दुष्परिणामही दिसत आहेत. अनेक जण फोनच्या आहारी जात आहेत.
2 सोशल मीडियावर तासन्तास वाया घालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बऱयाच बायकांना मोबाईलचे व्यसन जडलेले दिसत आहे. त्या दिवसातील बरेच तास रील्स, यूटय़ुबवर असतात.
3 जर पत्नीला जडलेले मोबाईलचे व्यसन सोडायचे असेल तर सर्वात आधी शांतपणे आणि प्रेमाने तिच्याशी संवाद साधा. जास्त फोनचा वापर करणे चुकीचे आहे, हे तिला पटवून द्या.
4 तिला मोबाईलऐवजी इतर मनोरंजक गोष्टींमध्ये गुंतवण्यासाठी प्रोत्साहन द्या. तिला फिरायला घेऊन जा. एखादा छंद जोपासायला सांगा. तिला कामांमध्ये मदत करा.
5 संवाद साधूनही काही फरक पडत नसेल आणि परिस्थिती गंभीर होत असेल, तर समुपदेशकाची मदत घेण्याचा विचार करा. हळूहळू मोबाईलचे व्यसन कमी करायला सांगा.


























































