रितेश देशमुखच्या भव्य ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज; १ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज शिवजयंतीच्या मंगल मुहूर्तावर अभिनेता -दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख याचा महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट हिंदुस्थानी इतिहासातील स्वराज्य स्थापनेचा जाज्वल्य प्रवास मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. हातात फडकणारा भगवा ध्वज, डोळ्यांतील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले महाराजांचे तेजस्वी रूप पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुवर्ण अक्षरातील नाव आणि भव्य प्रकाशयोजना या ऐतिहासिक गाथेची भव्यता अधोरेखित करत आहे.

हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. केवळ महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानच नव्हे, तर शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा मानस निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे, हा ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा १ मे २०२६ रोजी म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’च्या मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)