अमरावतीत भरधाव ट्रकची सायकलला धडक; सायकलस्वाराचा मृत्यू

accident

अमरावतीत भर चौकात एका सायकलला भरधाव ट्रकने धडक देत चिरडल्याची घटना शनिवारी शेगाव चौकात घडली. कृष्णानगर येथे राहणारे जी.एल. दास मोटवानी ( वय 64) सायकलने जात असताना शोगाव चौकातच भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. त्यामुळे मोटवानी जागीच कोसळले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेगाव नाका चौकात असलेल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी चौकात धाव घेत ट्रकचालकाला अटक केली. पोलीस या प्रकरणी पुढाल तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या