खडकीत ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एक जखमी

accident

पुण्यातील खडकीमध्ये भरधाव वेगातील ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर या अपघातात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. हा अपघात सोमवारी सकाळी 9.45 वाजता खडकीतील ऑर्डनन्स फॅक्टरीसमोरील रस्त्यावर घडला. जयवंत चंद्रकांत विश्वकर्मा (वय 38, रा. गणेशनगर, बोपखेल) असे अपघातात मत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक इशरत अब्रार हुसेन (वय 28, रा. नागपूर) याला अटक केली आहे. या प्रकरणी अरविंदकुमार विश्वकर्मा (वय 24 ) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत आणि अरविंदकुमार नातलग असून सोमवारी सकाळी 9.30 सुमारास ते दुचाकीवरुन कामाला जात होते. त्यावेळी ऑर्डनन्स फॅक्टरीसमोरील रस्त्यावर भरधाव आलेल्या ट्रकने जयवंत यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या जयवंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर अरविंदकुमार जखमी झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या