
रस्त्यावरून चाललेल्या प्रवासी बसला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राजस्थान येथील जैसलमेर येथे हा अपघात झाला असून त्यात 5 जण जखमी झाले आहेत.
या बसमधील प्रवासी हे तेमबडे राय मंदिराहून दर्शन करून परतत होते. तेव्हा हा अपघात झाला. बस पोलजी डेअरीकडे असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आली आणि तिथून विजेचा प्रवाह बसमध्ये गेल्याने हा अपघात झाला.
या अपघातात 3 जण मृत्युमुखी पडले असून 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून गंभीर जखमींना जोधपूरच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.



























































