मुंबई इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणाची वाढती समस्या यामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनांची व्रेझ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नेक्सझू मोबिलिटीने सायकलप्रेमींसाठी रोडलार्क इलेक्ट्रिक सायकल आणली आहे. ही सायकल एका चार्जिंगमध्ये शंभर कि.मी. अंतर कापते असा दावा कंपनीने केला आहे. या सायकलचा टॉप स्पीड ताशी 25 कि.मी. इतका आहे. रोडलार्क इलेक्ट्रिक सायकलमध्ये 5.2 एएच इन फ्रेम आणि डिटेचेबल 8.7 अशा दोन बॅटरी आहेत. तसेच बीएलडीसी 250 डब्ल्यू, 36 व्होल्ट मोटर आहे. एबीएससह डय़ुअल डिस्क ब्रेक आणि पेडल असिस्ट मोडदेखील उपलब्ध आहेत.





























































