निर्णय न घेणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांना घरचा रस्ता,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तंबी

रस्ते दुरुस्तीच्या कामात चालढकल करणाऱ्या तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा कारभार लालफितीत अडकवणाऱ्या अकार्यक्षम, कामचुकार अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जाईल, अशी तंबीच केंद्रीय रस्ते, वाहतूक राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली. दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित रस्ते सुरक्षेविषयीच्या बैठकीत ते बोलत होते.

हिंदुस्थानात सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत आहेत. त्यामुळे देशातील रस्ते वाहतूकीसाठी सुरक्षित बनविण्यात कटीबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. फाईल दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते त्यांच्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्यांनाही काम करता येत नाही. त्यामुळे कार्यालयातील वातावरण बिघडते. तसेच यापुढे चुकीच्या रस्त्याच्या इंजिनीयरींगसाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पोलिसांना लवकरच टॅबचे वाटप

देशभरात विविध रस्ते अपघाताच्या दुर्घटनांची संख्या एकत्रित करण्याचे काम केंद्राने सुरू कले आहे. भारतीय रस्ते दुर्घटना डाटा असे याचे नाव असून त्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना या कामासाठी सुमारे 30 हजार टॅबचे वाटप केले जाणार आहे.

वेगाचे 97 हजार 500 बळी

देशात वर्ष 2018 मध्ये सुमारे दीड लाख लोक हे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडल्याची माहिती यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. यातील तब्बल 97 हजार 500 जण वेगाचे वळी पडले आहेत. नव्या वर्षात रस्ते सुरक्षा नियमांचे पालने करण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या