
सामना प्रतिनिधी । लातूर
औसा तालूक्यातील मौजे चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरट्यांनी दरवाजा तोडून सुमारे ४० हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कमलाकर विठ्ठल काकडे यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जिल्हा परिषद शाळेच्या दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. एलईडी, होम थिएटर, शालेय उपयोगी साहित्य असा सुमारे ४०२०० रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला. किल्लारी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































