रॉबर्ट वाड्रा पुन्हा ‘ईडी’च्या कार्यालयात हजर, लंडनमधील मालमत्ता खरेदीमुळे अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज पुन्हा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आहेत. बुधवारी तब्बल सहा तास त्यांची चौकशी केल्यानंतर आज देखील वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्यावर लंडनमधील मालमत्ता खरेदी करताना मनी लाँडरिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

रॉबर्ट वाड्रा ‘ईडी’समोर हजर

मनी लाँडरिंगप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने रॉबर्ट वाड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत संरक्षण दिले आहे. वाड्रा यांनी ‘ईडी’च्या चौकशीस सहकार्य करावे, तसेच 6 फेब्रुवारीला ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहावे असे आदेश वाड्रा यांना दिले होते. बुधवारी वाड्रा यांची जवळपास सहा तास त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काल त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या, मात्र कार्यालयाच्या गेटवरून त्या मागे परतल्या. एखाद्या तपास यंत्रणेसमोर चौकशीसाठी हजर होण्याची वाड्रा यांची कालची पहिलीच वेळ होती.