रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

663

तांबडी येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांना गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले, तांबडी येथील घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा, तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबतही शासन स्तरावर विचार केला जाईल असे देसाई यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या