रोहिंग्याना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने 23 मृत, 30 बेपत्ता

म्यानमारच्या राखीन राज्यातून पळून गेलेल्या 23 रोहिंग्यांचे मृतदेह बोट बुडाल्यानंतर बाहेर काढण्यात आले आहेत. तीसजण अजून बेपत्ता आहेत, तर आठ जण या दुर्घटनेतून वाचले आहेत.

दरवर्षी हजारो रोहिंग्या मलेशिया किंवा इंडोनेशियाला पळून जाण्यासाठी धोकादायक समुद्र प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम रोहिंगे हे प्रामुख्याने बौद्ध धर्मीय म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याक आहेत. बर्मी सैन्याने सुरू केलेल्या नरसंहारापासून वाचण्यासाठी बरेच जण 2017 मध्ये बांगलादेशात पळून गेले. म्यानमारमध्ये राहिलेले लोकही २०२१ मध्ये लष्करी बंडानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मरण पावलेल्यांमध्ये १३ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. गर्दीने भरलेल्या मच्छीमारांच्या बोटींचा लांबचा प्रवास नेहमीच धोकादायक असतो. बहुतेक रोहिंग्या ऑक्टोबर ते मे महिन्यांदरम्यान ओलांडण्याचा प्रयत्न करतात.