
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गुरुवारपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला अडिलेडच्या ओव्हल मैदानावर सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि फिरकी गोलंदाज आर. अश्विननं चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. दोघांनी अडिलेडमध्ये मैदानाबाहेर रस्त्यावर एका पत्रकाराप्रमाणे चाहत्यांशी चर्चा केली, त्यांना प्रश्नही विचारले. यावेळी चाहत्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहात होता.
Rohit & Ashwin surprise fans on the streets of Adelaide
Ever wondered how you would feel if @ImRo45 or @ashwinravi99 walked up to you on the streets randomly? The duo did just that on their way back from the Adelaide Oval – by @28anand
️️️ https://t.co/iboI3dCvQz pic.twitter.com/7hQoguzM6d
— BCCI (@BCCI) December 5, 2018
मालिका विजयाची संधी
6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी दोन्ही संघांची जय्यत तयारी झाली आहे. टीम इंडियाला आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही. त्यामुळे टीम इंडियाला 70 वर्षात पहिल्यांदाच विजयाची सुवर्णसंधी आहे. विराटकडे उत्तम गोलंदाज आणि दमदार फलंदाजी असल्याने त्याच्याकडून चाहत्याच्या ऐतिहासिक कामगिरीच्या अपेक्षा आहेत.



























































