
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने विभागनिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. मुंबई पालिकेची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर तर ठाणे, मीरा-भाईंदर, उल्हासनगर पालिकेची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राहणार आहे.
राज्यातील 29 पालिकांसाठी विभागनिहाय निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली, भिवंडी- निजामपूर खासदार बाळय़ामामा म्हात्रे, वसई, नाशिक सुनील भुसारा, नवी मुंबई, पनवेल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मालेगाव भास्कर भगरे, अहिल्यानगरची नीलेश लंके, जळगाव संतोष चौधरी, धुळे प्राजक्त तनपुरे, सोलापुर धैर्यशील पाटील, कोल्हापुर हर्षवर्धन पाटील, परभणी फौजीया खान, जालना राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी राहणार आहे.
पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी राहणार आहे. पिंपरी-चिंचवड अमोल कोल्हे, सांगली-मिरज-कुपवाडा जयंत पाटील, छत्रपती संभाजीनगर बजरंग सोनावणे, नागपूर अनिल देशमुख यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.



























































