रोहित-विराट वर्ल्ड कप खेळणारच

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने जोरदार खेळ केला होता. ते हिंदुस्थानी संघाचे अविभाज्य घटक आहेत. आता त्यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेय ते टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठीच आणि दोघेही जून महिन्यात वर्ल्ड कप खेळताना दिसतील, असा दृढ विश्वास माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केला आहे. वर्ल्ड कप आणि अन्य आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खूप फरक असतो. वर्ल्ड कपमध्ये प्रचंड दबाव असतो. मला विश्वास आहे दोघेही आपल्या खेळाचा करिश्मा विंडीज आणि अमेरिकेत दाखवतील. वर्ल्ड कपच्या आधी अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी दोघांची संघात निवड केली आहे आणि टी-20 वर्ल्ड कपच्या पूर्वतयारीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल, असेही गांगुली पत्रकार परिषदेत म्हणाला.