‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

टीम इंडियाचा सलामीवीर ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा सुपर फॉर्म पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही कायम आहे. सलामीला आलेल्या रोहितने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढत दणदणीत शतक ठोकले. रोहितचे गेल्या पाच एक दिवसीय लढतींतील दुसरे शतक आहे.

World cup 2019 Ind Vs Pak LIVE

वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीत रोहितने आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीतही रोहितने 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. वर्ल्डकपपूर्वी झालेल्या अखेरच्या दोन लढतीतही रोहितने 95 आमि 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.

गेल्या पाच लढतीत रोहितची कामगिरी
1. 92 चेंडूत 95 धावा
2. 89 चेंडूत 56 धावा
3. 144 चेंडूत नाबाद 122 धावा
4. 70 चेंडूत 57 धावा
5. शतक झळकावून मैदानात आहे