आयसीसी वन डे रँकिंग, रोहितची दुसऱ्या स्थानी झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन । दुबई

टीम इंडियाला यंदाचा आशिया चषक जिंकून देणारा हंगामी कर्णधार रोहित शर्मा याने यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आयसीसी वन डे क्रिकेट रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हिंदुस्थानी वन डे संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितने आशिया चषकातील 5 डावांत 105.66 च्या सरासरीने 317 धावांची नोंद केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच हिंदुस्थानला आशिया चषकाचे जेतेपद राखता आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीने 884 गुणांकासह टॉपचे स्थान कायम राखले आहे.

वन डे गोलंदाजीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 797 गुणांकासह पहिल्या स्थानी असून दुसऱया स्थानी अफगाणिस्तानचा अष्टपैलू फिरकीवीर रशीद खान 788 गुणांकासह दुसऱ्या स्थानी आहे. बुमराहने आशिया चषकात 4 डावांत 8 विकेट मिळवल्या. अखेरच्या डेथ ओव्हर्समधील त्याची गोलंदाजी अफलातूनच झाली. अफगाणी रशीद खानने 5 डावांत 10 विकेट मिळवत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये गोलंदाजीत दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. त्याच्यापाठोपाठ हिंदुस्थानी चायनामेन गोलंदाज कुलदीप यादवने तिसऱ्या स्थानी मजल मारली आहे.

फलंदाजांची आयसीसी रँकिंग
1) विराट कोहली     हिंदुस्थान     884 गुणांक
2) रोहित शर्मा        हिंदुस्थान     842 गुणांक
3) जो रुट             इंग्लंड        818 गुणांक
4) डेव्हिड वॉर्नर    ऑस्ट्रेलिया      803 गुणांक
5) शिखर धवन      हिंदुस्थान       802 गुणांक
6) बाबर आझम     पाकिस्तान      798 गुणांक
7) रॉस टेलर         न्यूझीलंड       785 गुणांक
8) क्विंटन डि’कॉक द. आफ्रिका     781 गुणांक
9) केन विलियम्सन   न्यूझीलंड       778 गुणांक
10) जॉनी बेअरस्टो    इंग्लंड        769 गुणांक

summary- rohit-sharma-on-second-rank-in-icc-ranking