Royal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद 

1183
कॉलेजमधील तरूणांना रॉयल एनफिल्डचे प्रचंड वेड असते.

Royal Enfield हिंदुस्थानी बाजारात आपल्या 500 सीसी बाईकची विक्री बंद करू शकते. एचटी मिंटच्या वृत्तानुसार, कंपनी हिंदुस्थानात Bullet 500, Classic 500 आणि Thunderbird 500 या बाईकची विक्री करते. या बाइकमध्ये असलेले इंजिन बदलून नवीन नियमानुसार बीएस 6 इंजिनसह या बाईक अपग्रेड करण्यासाठी जास्त खर्च येऊ शकतो. तसेच या बाईक्सची हिंदुस्थानी बाजारात मागणी कमी असल्यामुळे या बाईक्स बंद केल्या जाऊ शकतात. या बाईक्स ऐवजी कंपनी आपल्या 350 सीसी श्रेणीतील बाईक्सला अपग्रेड करणार. ज्याची बाजारात अधिक मागणी आहे, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे की, ‘सुरुवातीला निर्यात बाजारासाठी 500 सीसी बाइक्स बनवण्यात आल्या होत्या. कंपनीने 2009 साली नवीन लाइटवेट युनिट कन्स्ट्रक्शन इंजिन प्लॅटफॉर्मचा वापर करून या बाईक्स बाजारात लॉन्च केल्या होत्या. त्यावेळी हिंदुस्थानात 500 सीसी बाईकची मागणी वाढली होती. दरम्यान अद्याप Royal Enfield आपल्या 500 सीसीच्या बाईक बंद केल्याची घोषणा केलेली नाही. मात्र कंपनी लवकरच याबाबत माहिती देणार असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या