RSAvsIND दुसऱ्या दिवशी पावसाची ‘बॅटिंग’, एकही चेंडू न टाकता खेळ रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरीयनच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

पहिल्या दिवशी हिंदुस्थानने सलामीवीर केएल राहुलच्या नाबाद शतकी आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर 3 बाद 272 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा राहुल 122 आणि अजिंक्य रहाणे 40 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी हे दोघे संघाला मोठी धावसंख्या रचून देतील अशी आशा क्रिडा चाहत्यांना होती. मात्र या आशांवर पावसाने पाणी फिरवले.

14 वर्षांची प्रतिक्षा संपली

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकेश राहुलच्या रूपाने हिंदुस्थानी सलामीवीराला कसोटी शतक झळकावण्यात यश आले. याआधी वसीम जाफरने सलामीवीर म्हणून 2007 साली केपटाऊन कसोटीत 116 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेत सलामीवीर म्हणून पहिले कसोटी शतक झळकावले होते. राहुलने 217 चेंडूंत शतक पूर्ण केले.

Ashes 2021 मैदानात अश्लील टिप्पणी, खेळाडूचा उद्दामपणा स्टंपमधील माइकमध्ये कैद; Video

एकमेव फलंदाज

सेंच्युरीयमधील शतक राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक आहे. परदेशातील राहुलचे हे सहावे कसोटी शतक आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या तीन देशांत कसोटी शतक ठोकणारा राहुल हा एकमेव हिंदुस्थानी फलंदाज होय हे विशेष.