एकजुटीतच हिंदूंचा विकास होईल – सरसंघचालक

18

सामना ऑनलाईन । शिकागो

एकजुटीत मोठी शक्ती आहे. हिंदूंचा विकास हा एकजुटीतूनच होऊ शकतो. त्यामुळे हिंदूंनो एकजूट व्हा, संघटित व्हा आणि जगाच्या कल्याणासाठी काम करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अमेरिकेतील शिकागो येथे दुसऱया जागतिक हिंदू परिषदेत ते बोलत होते. जगभरातून या परिषदेला 2500 जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली शिकागो येथे सर्व धर्म परिषदेत भाषण करून हिंदू धर्माची पताका जगभर फडकवली. दरवर्षी त्या निमित्ताने ही परिषद भरवली जाते. त्यांच्या ऐतिहासिक भाषणाला यावेळी 125 वर्षे झाली. एकमताचा स्वीकार करणे आणि अहंकाराला ताब्यात ठेवण्याच्या गुणामुळे सगळे जग एकसंध होईल. भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठर यांच्यात नेहमीच एकमत असे. तसे प्रयत्न झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरही उपस्थित होते.

हिंदूंमध्ये एकजुटीचा अभाव आहेत. हिंदू हे सिंहाप्रमाणे आहेत. पण जर सिंह एकटा असेल आणि त्याला चार रानटी कुत्र्यांनी घेरले तर अशा वेळी ते कुत्रे सिंहालाही फाडून खातात हे आपण विसरू नये असे उदाहरणासह स्पष्ट करत एकजुटीचे आवाहन केले. धर्माची मूलभूत तत्त्वे आणि आध्यात्मिकता विसरल्यामुळे आज हिंदूंची दैन्यावस्था झाली आहे. त्यामुळे आपल्या सगळय़ांना एकाच छताखाली येणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या