RSS ची स्तंभलेखकांसोबत बंद दाराआड गुप्त बैठक, संघाबाबतचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न

867

देशाचे राजकारण आणि समाजकारणात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) संघाबाबतचे समज-गैरसमज स्पष्ट करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल उचलले आहे. संघाने राजधानी दिल्लीत देशातील 80 स्तंभलेखकांसोबत पूर्ण दिवस बैठक मंगळवारी आयोजित केली होती. मात्र ही बैठक बंद दाराआड पार पडल्याने तिचा तपशील मात्र गुप्त ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गेल्या वर्षी हिंदुस्थानात कार्यरत विदेशी मीडियाच्या प्रतिनिधींना भेटले होते.त्यातूनच मीडिया प्रतिनिधींशी विशेष बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मंगळवारच्या बैठकीला 30 देशांचे विविध भाषांत लिखाण करणारे 80 स्तंभलेखक उपस्थित असल्याचे वृत्त आहे.दिल्लीच्या छत्तरपूर येथे आयोजित ही बैठक अतिशय गुप्त असल्याने तिचा तपशील कुणालाही कळू शकलेला नाही.

सरसंघचालकांच्या बौद्धिकानंतर “मुक्तचिंतन”
सरसंघचालक मोहन भागवत यांनी बैठकीत संघाच्या कार्याची आणि भूमिकेची माहिती देणारे बौद्धिक दिले. त्यानंतर उपस्थित पत्रकारांनी मुक्तचिंतन सत्रात संघाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या शंकाचे निरसन करून घेतले अशी माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या