
इंडस्ट्रीयल डिझाईन, गेम आणि ऑनिमेशन अशा विविध विषयांमध्ये कोर्सेस उपलब्ध करून देणाऱ्य़ा रुबिका या अग्रेसर फ्रेंच क्रिएटिव्ह स्कूलच्या शास्त्रीय सल्लागार मंडळामध्ये प्रख्यात कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार यांची निवड करण्यात आली आहे. रुबिका फ्रान्स या शैक्षणिक संस्थेच्या संपूर्णतः मालकीची असलेली रुबिका इंडिया आहे.
या निवडीबाबत गुलजार म्हणाले, ‘ऑनिमेशन, नरेटिव्हस आणि स्टोरीटेलिंग विषयांमध्ये विद्यार्थ्यांना माझ्या अनुभवाचा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. कविता आणि सिनेमा या क्षेत्रामध्ये अधिकाधिक योगदान देण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या कामामुळे शिक्षण क्षेत्रात भर पडणार आहे हे पाहून मला आनंद होत आहे.’ दरम्यान, गुलजार यांच्याशी असलेल्या सहयोगामुळे ऑनिमेशन, दिग्दर्शन, सृजनशील लेखन, नरेटिव्ह आणि स्टोरीटेलिंग या क्षेत्राशी संबंधित शिक्षणाच्या असंख्य संधी आमच्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण होतील, असे रुबिका स्कूलच्या वतीने सांगण्यात आले.





























































