
द्राक्षांचा एक घड साधारण किती रुपयांना विकला जाईल? फार तर शे-दोनशेला. तेच जर कुणी सांगितलं की तब्बल 9 लाखांना द्राक्षांचा घड विकला गेलाय, तर विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. जगातील सर्वात महागडी द्राक्षे लाखो रुपयांची बोली लावून विकली जातात. रुबी रोमन असे या द्राक्षांच्या प्रकाराचे नाव आहे.
2020 साली एका लिलावामध्ये रुबी रोमन द्राक्षांच्या एका घडासाठी तब्बल 8 लाख 80 हजार रुपयांची बोली लावण्यात आली होती. अनेकदा या घडांमधील द्राक्षांची संख्या ठरलेली असते. म्हणजे त्या लिलावात एका द्राक्षाची किंमत 30 हजार रुपयांपर्यंत गेली होती.
साधारणपणे रुबी रोमन द्राक्षांचा मोठा घड तब्बल 70 हजार रुपयांपर्यंत विकला जातो. हे फळ विकताना लिलाव केला जातो. जो जास्त पैसे मोजणार त्याला फळ विकले जाते. खास करून जपानमध्ये या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. या द्राक्षांचा आकार हा सामान्य द्राक्षांपेक्षा फारच मोठा असतो. तसेच ही द्राक्षं चवीला फार गोड असतात. विशेष म्हणजे जपानमध्येसुद्धा इशिकावा प्री-फ्रेक्चरल या एकमेव कंपनीकडून या द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. या द्राक्षांना मागणी असली तरी त्यांचं उत्पादन मर्यादित आहे.



























































