व्हीआयपींच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेचे नियम

व्हीआयपी मंडळींना हेलिकॉप्टर प्रवासासाठी सुरक्षेचे पुढील नियम अनिवार्य असतात. बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर प्रवास सुरू होण्यापूर्वी त्याची खातरजमा केली गेली की नाही? याबद्दल आता चौकशी होणार आहे. ते नियम पुढीलप्रमाणे…

 • पायलटचे लायसन्स सर्टिफाइड असावे.
 • हेलिकॉप्टर लॅण्ड होण्यास पुरेशी जागा असावी.
 • विमानाच्या क्रूने प्रवासाची योग्य माहिती ठेवावी. झाडे, हाय टेन्शन वायर्स, हेलिपॅडचे को-ऑर्डिनेट तपासून घ्यावेत.
 • विमान प्रवासाचा रूट आणि किती लोक असणार आहेत याची माहिती जवळच्या एअर ट्रफिक सेंटरला देण्यात यावी
 • विमान प्रवासापूर्वी हवामानाची पूर्व माहिती घ्यावी.
 • प्रवाशांची मेडिकल तपासणी अनिवार्य.
 • विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा माल नसावा.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या  हेलिकॉप्टर प्रवासाचे नियम

 • दोनपेक्षा जास्त जनरल रँकच्या अधिकाऱयांनी एकत्र प्रवास करू नये.
 • सुरक्षा तपासणी अत्यंत महत्त्वाची.
 • ठरावीक व ठरलेल्या वेळीच प्रवासाची परवानगी.
 • हवामान आणि महिन्याप्रमाणे प्रवास निश्चित असतो.
 • ज्या ठिकाणी उतरणार किंवा उड्डाण घेणार तेथे इंधनाचा पुरेसा पुरवठा असावा.
 • आपात्कालीन स्थितीत अॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय मदतीची तयारी असावी.
 • वरिष्ठ लष्करी अधिकाऱयांच्या हवाई प्रवासावेळी दोन्ही पायलटचे प्रशिक्षण नेमके काय आणि कसे झाले आहे, संबंधित विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये टेक्निकल सर्व गोष्टी नेमक्या काय आहेत याची माहिती आधी घेतली जाते.