अमित साध याचे युवराज सिंगच्या माजी प्रेयसीशी सूत जुळले? गोव्यात एकत्र फिरताना पाहिल्याने चर्चांना उधाण

अभिनेता अमित साध हा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. या दोघांना गोव्यात एकत्र पाहिल्याने या चर्चांना सुरूवात झाली आहे. ही अभिनेत्री क्रिकेटपटू युवराज सिंगची माजी प्रेयसी होती. या चर्चांबाबत अमित साध याला विचारलं असता त्याने म्हटलं की मी अशा चर्चांची पर्वा करत नाही आणि मी प्रेम लपून छपून करणार नाही.

अमित साध याने ज्या अभिनेत्रीसोबत त्याचं नाव जोडलं जातंय तिच्याबाबत बोलताना म्हटलं की बॉलीवूडमधल्या एखाद्या अभिनेत्रीबाबत अशा पद्धतीने बोलणं अयोग्य आहे. त्या अभिनेत्रीला मी गोव्यामध्ये योगायोगाने भेटलो होतो असंही अमितने म्हटलं आहे. गोव्यामध्ये आराम करण्यासाठी गेलेलो असताना आपण सकाळी उठायचो, समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जायचो, मासे खायचो आणि रात्री 9 ला झोपायचो. रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना आपली या अभिनेत्रीशी भेट झाल्याचं अमित साध याने म्हटलं आहे.

ज्या अभिनेत्रीशी अमित साध याचं नाव जोडलं जात आहे तिचं नाव किम शर्मा असून तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तिची कारकीर्द दीर्घकाळ चालली नव्हती. क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधांच्या बातम्यांमुळे ती बरीच प्रकाशझोतात आली होती. मात्र दोघांचे प्रेमसंबंध फार काळ टीकले नाहीत. युवराज सिंग याने अभिनेत्री हेजल किच हिच्याशी लग्न केले होते.

अमित साध याने ऑक्टोबर महिन्यात पतियाळा आणि मनाली इथले त्याचे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. मुंबईला आल्यानंतर तो तडक गोव्याला निघून गेला होता. सुट्टीचा आनंद लुटल्यानंतर अमित खोपोलीतल्या एका गावामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आला होता. त्यानंतर तो दुबईला गेला असून तो सध्या तिथेच आहे. गेल्या काही महिन्यात आपण उणे 4 ते 40 डिग्री सेल्सियस तापमान अनुभवले असल्याचं त्याने मिश्कीलपणे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या