
दोन वर्षांपूर्वी हुकलेले जेतेपद मुंबई श्री विजेत्या रसल दिब्रिटोने पटकावत महाराष्ट्र श्री होण्याचा मान मिळविला. कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर आणि पश्चिम ठाण्याच्या नितीन म्हात्रेवर मात करत रसलने आपली मसल पॉवर दाखवली. तसेच मुंबईने सर्वाधिक पाच सुवर्ण जिंकत सांघिक जेतेपदाचाही मान मिळविला. मुंबई उपनगर उपविजेता ठरला.
2020 साली झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत रसल दिब्रिटोला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तेव्हा पुण्याच्या महेंद्र चव्हाणने बाजी मारली होती, मात्र आता रसलने आपले अपयश धुऊन काढले. गतविजेता महेंद्र चव्हाणनेही जेतेपद राखण्यात जराही रस दाखवला नाही. तसेच जबरदस्त फार्मात असलेल्या मुंबई श्री विजेत्या नीलेश दगडेनेही वैयक्तिक कारणामुळे खेळत नसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष किरण सावंत यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड येथे भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही मिस मुंबई हर्षदा पवारने बाजी मारली, तर महिलांच्या मॉडेल फिजिकमध्ये उपनगरची रेणुका जनौती अव्वल आली.
महाराष्ट्र श्री स्पर्धेचा निकाल ः 55 किलो वजनी गट ः 1. ओमकार आंबेकर (मुंबई), 2. नितीन शिगवण (मुंबई उपनगर), 3. मंगेश पाटील (ठाणे); 60 किलो ः 1. रामा मायनाक ( सातारा), 2. बप्पन दास ( मुंबई), 3. दीपक गुप्ता (ठाणे); 65 किलो ः 1. नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), 2. आकाश घोरपडे (मुंबर्ई ), 3. गणेश पारकर (मुंबई उपनगर); 70 किलो ः 1. संदीप सावळे (मुंबई उपनगर), 2. पंचक्रांती सोनार (सोलापूर), 3. श्रीनिवास वास्के (पिंपरी-चिंचवड); 75 किलो ः 1. रोहन गुरव (मुंबई उपनगर, 2. अभिजित पाडळे (सातारा), 3. दीपक डांबळे (नाशिक); 80 किलो ः 1. विश्वनाथ बकाली (सांगली), 2. गणेश पेडामकर (मुंबई), 3. आशीष लोखंडे (मुंबई उपनगर); 85 किलो ः 1. अजिंक्य रेडेकर (कोल्हापूर), 2. महेश राव (ठाणे), 3. अनिकेत पाटील (मुंबई); 85 किलोवरील ः 1. रसल डिब्रेटो (मुंबई). 2. दीपक तांबीटकर (मुंबई), 3. समीर ताळे (ठाणे). महिला शरीरसौष्ठव ः 1. हर्षदा पवार (मुंबई), 2. तन्वीर हक (पिंपरी-चिंचवड), 3. मनीषा हळदणकर (ठाणे). महिला मॉडेल फिजिक ः 1. रेणुका जनौती (मुंबई उपनगर), 2. अदिती बंब (पिंपरी-चिंचवड), 3. शीतल वाडेकर (पिंपरी-चिंचवड).


























































