101 किलोची बायको नवऱ्याच्या तोंडावर बसली आणि पुढे भयंकर झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. 101 किलो वजनाची बायको दारुच्या नशेत नवऱ्याच्या तोंडावर बसून नवऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना रशियामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार एका दाम्पत्यामध्ये काही कारणावरून भांडण झाले. भांडण वाढत गेले. त्यावेळी त्याची बायको दारुच्या नशेत धुंद होती. बायकोने नवऱ्याला तिची माफी मागायला सांगितली. मात्र त्याने मागितली नाही. तो बडबड करतच होता. त्यावेळी संतापलेली बायको नवऱ्याची बडबड बंद करायला त्याच्या तोंडावर जाऊन बसली. या महिलेचे 101 किलो वजन होते. जसे ती नवऱ्याच्या तोंडावर बसली तसा तो गुदमरला. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मात्र पत्नीला कळलेच नाही की पतीला त्रास होतोय. ती त्याच्या तोंडावर त्याचा श्वास बंद होईपर्यंत बसूनच राहिली.

त्यावेळी त्यांची मुलगी तिथे होती. ती धावत शेजाऱ्यांना घेऊन आली. मात्र तोपर्यंत तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. नशेत धुंद असलेल्या बायकोला थोड्यावेळाने कळले की खरोखरंच तिच्या नवऱ्याच्या मृत्यू झाला. त्यावेळी तिला धक्का बसला. शेजारच्यांना कळल्यावर त्यांच्या घरी बघ्यांची गर्दी जमली.

याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना कळवले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही महिला पोलिसांना खरे सांगत नव्हती. मात्र वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतर महिलेने सांगितले की, तिला नवऱ्याला मारायचे नव्हते. तो खूप बोलत होता म्हणून त्याला शांत करण्यासाठी त्याच्या तोंडावर जाऊन बसले. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा उद्देश नवऱ्याला मारण्याचा नव्हता यावर ती ठाम आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.