माणसासारखा दिसणारा रोबोट रशियाने अंतराळात पाठवला

430

रशियाने गुरुवारी अंतराळात पाठवलेल्या मानवरहित यानाने चक्क माणसासारखा दिसणारा रोबोट आपल्यासोबत नेला. ‘फेडोर’ असे या रोबोटचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अंतराळवीरांच्या मदतीने दहा दिवसांचे प्रशिक्षण या रोबोटला देण्यात येणार आहे.

‘फेडोर’ हा रशियाने अंतराळात पाठवलेला पहिला रोबोट आहे. सोयुज- एमएस-14 यानातून स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी कझाकिस्तानच्या बैकनूर प्रक्षेपण केंद्रातून रोबोट अंतराळात पाठवण्यात आला. सोयूज शनिवारी अंतराळात पोचेल आणि

7 सप्टेंबरपर्यंत तिथे राहील. सोयूज यानातील

वैमानिकांच्या सीटवर ‘फेडोर’ या रोबोटला बसवण्यात आले आहे. त्याच्या हातात रशियाचा छोटा झेंडा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या