लेन्स आय – हमिंगबर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋता कळमणकर 

कोस्टारिका हा मध्य अमेरिकेतील अमर्याद पर्यटन क्षमता असलेला असा समृद्ध देश. कोस्टारिका म्हणजे सुपीक, समृद्ध किनारा. कोस्टारिकाच्या पूर्वेला कॅरेबियन समुद्र तर पश्चिमेला पॅसिफिक महासागर आहे. प्रामुख्याने स्पॅनिश भाषा बोलली जाते. येथील कॉफी तर जगप्रसिद्ध आहे.

वर्षभर येणारी भरपूर फळे आणि त्यासाठी येणाऱ्या जवळजवळ 840 पक्ष्यांच्या जाती-प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. टोकान मकाऊ, हमिंगबर्ड, विविधरंगी टॅनेजर असे अतिशय रंगीबेरंगी पक्षी तसेच सरपटणारे आणि उभयचर प्राणी आढळतात. जगातील सर्वात वेगवान लिझार्ड, spine trailed equana कोस्टारिकामध्ये आढळतो.

अरेनाल ज्वालामुखीच्या प्रदेशात विविध प्रकारचे बेडूक, फुलपाखरे, सर्प पाहायला मिळतात. कोस्टारिकाच्या क्लाऊड फॉरेस्टमध्ये अतिशय वेगाने पंख फडफडवत उडणारे हमिंगबर्ड दिसतात.

हमिंगबर्ड हा आकाराने लहान, पण अतिशय कलरफुल पक्षी. बहुतेक हमिंगबर्डच्या सर्व प्रजाती आकाराने (3-5 ) इंच असतात. फुलातील मध, परागकण, कीटक यांवर गुजराण करतात. जगात या पक्ष्याच्या अंदाजे 325 प्रजाती आहेत. वातावरण बदलामुळे या प्रजाती स्थलांतर करतात.

हमिंगबर्ड हे दक्षिण-उत्तर स्थलांतर करतात. यांच्या चयापचयाची गती ( मेटाबोलिझम) प्रचंड असते. अत्यंत  वेगाने पंख फडफडवणारे हे पक्षी सेकंदाला साधारण 50 वेळा पंखांची हालचाल करतात.

ग्रीन ज्वेल, रुबी थ्रोटेड, व्हायोलेट सबरविंग, व्हायोलेट ईअर अशा अनेक रंगीबेरंगी हमिंगबर्डच्या प्रजाती आपल्याला सेंट्रल अमेरिकेतील  कोस्टारिका येथे पाहायला मिळतात.

पंखाच्या वेगवान हालचालीमुळे यांच्या फोटोग्राफीसाठी muledtiledaefshed तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळेच याची वेगवान हालचाल

कॅमेऱ्यात कैद करता येते. हमिंगबर्डप्रमाणेच कोस्टारिका येथे टोकान, विविधरंगी पॅरट, वूड पेकेर, मोन्तेझोआ असे अनेक पक्षी दर्शन देतात.

येथील  जंगले  तुमच्या डोळ्यांना मेजवानी देणारी तर आहेतच, फुले, फुलपाखरे, सुरेख लॅण्डस्केप आणि अनोखे वन्य जीव यामुळे कोस्टारिकाची सहल सर्वांगीण सुंदर ठरते.

[email protected]