धोनीच्या संघाला तिसरा धक्का, आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिपक चहर कोरोना पॉझिटिव्ह आढळला, सुरेश रैना खासगी कारणास्तव मायदेशी परतला असे दोन मोठे धक्के पचवत सावरत असलेल्या चेन्नईच्या संघाला तिसरा जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा फलंदाज रुतुराज गायकवाड कोरोना प़ॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा संघात खळबळ उडाली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला शनिवारी मोठा धक्का बसला. संघातील गोलंदाज दीपक चहर हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.  त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जमधील सर्व खेळाडूंसह सपोर्ट स्टाफलाही क्वारंटाइन व्हावे लागले आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ 21 ऑगस्टला दुबईला पोहोचला होता. शुक्रवारी त्यांचा क्वारंटाइन कालावधीही पूर्ण झाला होता. पण आता आणखी एक आठवडय़ाने हा कालावधी वाढवण्यात येणार आहे.

यूएईमध्ये पोहोचल्यानंतर सहभागी संघांतील सर्वांनाच सरावाला सुरुवात करण्याआधी तीन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. बीसीसीआयकडून हा नियम तयार करण्यात आला आहे. पण चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे आता या संघातील सर्वांचीच चौथीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.