चंद्रपूर पालिकेने घेतली ‘सामना’च्या बातमीची दखल, फलकावरुन हटवली ‘ती’ जाहीरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

घरातून कुलर बाहेर पडण्यापूर्वीच मेघराजाने थैमान घातले. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानीं रोगराई पसरू नये म्हणून लोकांना जागरूक करणे सुरू केले. या दिवसांत डासांचा प्रकोप होऊ नये म्हणून मनपाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चौकात एक भला मोठा संदेश फलक झळकवला, मागील महिन्याभरापासून हा फलक जनतेला ‘डास ऐवजी डांस’ उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचा संदेश देत आहे. तो ही सांस्कृतिक सभागृहाच्या चौकात. या मथळ्याखाली सामना ने बातमी प्रकाशित केली होती. सामनाच्या बातमीची दाखल घेत महानगरपालिकेने ती जाहिरात त्या फलका वरून काढली.