लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गंजगोलाई येथील जगदंबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी औसा विधानसभा संपर्कप्रमुख नंदकिशोर परुळेकर, लातूर विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शामराव पाचंगे, लातूर ग्रामिण विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल वेंगुर्लेकर, अहमदपूर विधानसभा संपर्कप्रमुख ललीत कासले, उदगीर विधानसभा संपर्कप्रमुख जीवन सावंत, जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, पप्पूभाई कुलकर्णी, रमेश पाटील, बी.एन. डोंगरे, विष्णूपंत साठे, हरिभाऊ साबदे, अ‍ॅड. राहूल मातोळकर, कुलदीप सूर्यवंशी, अ‍ॅड. रवी पिचारे, गणेश कुलकर्णी, रमेश माळी, शिवाजी माने, अ‍ॅड. वैभव बिराजदार, विष्णू घुटे, गजानन बोळंगे यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.