
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण वनव्यातील पीडितांच्या मदतीसाठी रविवारी रिकी पॉन्टिंग इलेव्हन आणि ऍडम गिलख्रिस्ट इलेव्हन संघांत मदतनिधी सामना खेळवण्यात आला. या लढतीतून पीडितांसाठी 55 कोटी रुपयांचा निधीही उभारण्यात आला.पण लढतीचे आकर्षण ठरले ते मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पुन्हा फलंदाजीला मैदानात उतरणे.ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिस पेरीच्या आव्हानाला प्रतिसाद देत सचिन तिने टाकलेले एक षटकही खेळला.
ऑस्ट्रेलियन जंगलातील वणवाग्रस्तांच्या मदतीसाठी जगातले नामांकित माजी क्रिकेटर मैदानात उतरले होते. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिस पेरी हिने लढतीच्या एक दिवस आधी सचिनने माझे एक ओव्हर खेळून दाखवावे असे आव्हान सोशल साईटसवरून दिले होते.लढतीत पॉंटिंग इलेव्हनने गिलख्रिस्ट संघाला 1 धावेने पराभूत करत विजय मिळवला.पॉन्टिंग संघाकडून ब्रायन लाराने 11 चेंडूंत 30 तर कर्णधार पॉंटिंगने 14 चेंडूंत 28 धावांची खेळी केली.
पेरी तू मला आऊट कर ,आपण वणवा पिढीतांसाठी खूप निधी जमवू -सचिन
मॅडम पेरी मी तुझे ओव्हर खेळण्याचे आव्हान स्वीकारतोय. खरे तर खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेट खेळायला मनाई केलीय.पण तुमचे आव्हान स्वीकारून पीडितांसाठी मोठा निधी जमवता आला तर मला आनंदच होईल.तू तुझ्या गोलंदाजीवर मला आऊट केलेस तरी मला त्याचे वाईट वाटणार नाही ,असे उत्तर सचिनने पेरीच्या ट्विटला दिले होते.त्यामुळे तो पॉन्टिंग संघाचा प्रशिक्षक असतानाही मैदानात फलंदाजीला उतरला आणि पेरीने टाकलेले पूर्ण षटकही खेळला.


























































