सलामीला खेळण्यासाठी विनवण्या केल्या होत्या

1151

हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला एकेकाळी सलामीला फलंदाजी करण्यासाठी कर्णधार व संघव्यवस्थापनाकडे खूप विनवण्या कराव्या लागल्या होत्या. स्वतः सचिननेच हा किस्सा सांगितला.

सचिन म्हणाला, 1994 साली न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मी प्रथम सलामीला खेळायला सुरुवात केली, मात्र सलामीला खेळण्यासाठी मला संघव्यवस्थापनाच्या खूप विनवण्या कराव्या लागल्या. तेव्हा विकेट वाचवण्याची संघाची योजना होती, मात्र सलामीला फलंदाजीला येऊन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावे अशी माझी योजना होती. संघव्यवस्थापनला माझे मत काही पटले नसल्यामुळे सलामीला खेळण्यासाठी मला त्यांच्याकडे विनवण्या कराव्या लागल्या. इतकेच नव्हे तर मी या भूमिकेत जर अयशस्वी झालो तर मी पुन्हा कधीही तुमच्याकडे सलामीला खेळण्याचा हट्ट करणार नाही, असा शब्द मी संघव्यवस्थापनाला दिला होता. नशीब माझ्या बाजूने होते. मी त्या लढतीत 49 चेंडूंत 82 धावा ठोकल्या. त्यामुळे मला सलामीसाठी परत विनवण्या करण्याचे कारण नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या