त्यांनी जिंकला, आम्ही जिंकला ; आता पुनरावृत्ती होऊ दे! सचिन तेंडुलकरने व्यक्त केली इच्छा

हिंदुस्थानचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ने याने एक फोटो शेअर केला आहे. सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासोबतचा त्याचा हा फोटो X वर काही मिनिटांमध्येच लाखो क्रिकेटप्रेमींनी पाहिला आहे. या फोटोसाठी सचिनने लिहिलं आहे की “यातल्या एकाचा मी निस्मीस चाहता होतो, इतर दोघांसोबत मला खेळण्याची संधी मिळाली आणि या तिघांनी मिळून 1983 च्या विश्वचषक विजयाचा पाया रचला. तो आनंद मला 2011 साली गवसला आणि मला आशा आहे की हिंदुस्थानी क्रिकेट संघ 2023 चा विश्वचषक जिंकेल”