‘ग्रेट भेट’ महान क्रिकेटपटूंची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या वन डे मालिकेतील लॉर्ड्सवरील दुसऱया लढतीदरम्यान क्रिकेटला महान आणि लोकप्रिय बनवण्यात सिंहाचा वाटा उचलणारी दोन ‘लिजेंड’ व्यक्तिमत्त्वे एकमेकांना भेटली. त्यातले एक होते वेस्ट इंडीज क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवणारे सर गारफिल्ड सोबर्स आणि दुसरे होते हिंदुस्थानी क्रिकेटचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर. सचिनने ट्विट करीत या भेटीचे वर्णन ‘आज माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरील लढत पाहायला मी महान वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांच्यासोबत उपस्थित होतो,’ असे केले आहे.