‘सेक्रेड गेम्स’मधील गायतोंडेच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे निधन

2569
ramchandra-dhumal-saif-ali-khan

फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या यासह जवळपास 100 चित्रपटात अभिनय करून प्रेक्षकांवर आपली छाप सोडणारे रामचंद्र धुमाळ यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.  वास्तववादी भूमिकेसाठी ते प्रसिद्ध होते. सेक्रेड गेम्स मध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती.

अनेक मराठी, हिंदी चित्रपट, वेबसिरज, शॉर्ट फिल्ममधून आपल्या नैसर्गिक अभिनयाने धुमाळ काका प्रेक्षकांची मनं जिंकायचे. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटात त्यांचा अतिशय छोटा रोल होता पण तो प्रेक्षकांच्या अजुनही लक्षात आहे. सेक्रेड गेम्स मध्ये त्यांनी गायतोंडेंच्या (नवाझुद्दीन) वडिलांची भूमिका साकारली होती.

ramchandra-dhumal-saif-ali-khan

आपली प्रतिक्रिया द्या